ऑक्सफर्डसह भारतीय लसीसाठीही सीरमचे संशोधन ! – सायरस पूनावाला

सायरस पूनावाला

पुणे – कोरोनावर ऑक्सफर्ड विद्यापिठातील लसीसह आणखी ४ लसींसाठी सीरम इन्स्टिट्यूटने करार केले आहेत. सीरमने भारतीय संशोधकांच्या साहाय्याने संपूर्ण भारतीय बनावटीच्या कोवॅक्स लसीवर काम चालू केले आहे. या लसीसमवेत ऑक्सफर्डच्या लसीची तुलना करून अंतिम चाचणी घेतली जाईल आणि डिसेंबरमध्ये लस प्रत्यक्षात उपलब्ध होईल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी दिली आहे.

फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या वतीने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये पुनावाला बोलत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बीसीजीची लस अत्यंत लाभदायक ठरू शकते. आपण लहानपणी एकदा ही लस घेतल्यावर पुन्हा घेत नाही; मात्र, आता दुसरा डोस घेतल्यावर त्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून संसर्गाशी लढण्याची ताकद मिळू शकते, असा दावा सायरस पूनावाला यांनी केला.