सनातनचे ग्रंथ अध्यात्मातील दीपस्तंभ ! – आमदार महेश शिंदे, शिवसेना, कोरेगाव

सातारा – सनातनच्या ग्रंथांमध्ये अध्यात्माचे महत्त्व अत्यंत शास्त्रीय आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे. त्यामुळे अध्यात्मात वाटचाल करणाऱ्या प्रत्येकालाच हे ग्रंथ दीपस्तंभाप्रमाणे आहेत, असे गौरवोद्गार जिल्ह्यातील कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी काढले.

आमदार महेश शिंदे

दीपावलीनिमित्त सनातन संस्थेचे श्री. राहुल कोल्हापुरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र निकम यांनी आमदार शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांना सनातनच्या ग्रंथांची माहिती देण्यात आली. आमदार शिंदे यांनी सनातनच्या ३०० ग्रंथांची मागणी केली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. (सनातनच्या राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या ग्रंथांचे महत्त्व जाणून त्यांची मोठ्या प्रमाणात मागणी करणारे आणि सनातनच्या कार्याचा गौरव करणारे आमदार महेश शिंदे यांचे अभिनंदन ! – संपादक)