मुंबई – येथील महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात पुरेशी जागा नसल्याने भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यास महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे. पुतळा उभारायचाच असेल, तर स्थायी समिती आणि अन्य समिती सभागृह येथे उभारण्यात यावा, असा पर्याय प्रशासनाने सुचवला आहे.
जानेवारी २०१७ मध्ये महापालिका सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले. याच धर्तीवर ‘सभागृहात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यात यावा’, असा ठराव भाजपच्या दक्षा पटेल यांनी मांडला होता. वर्ष २०१८ मध्ये या ठरावाला महापालिका सभागृहात मान्यता मिळाली आहे. याविषयी महापालिका प्रशासनाने आपला अभिप्राय दिला असून त्यात जागेची अडचण असल्यामुळे पुतळा उभारण्यास नकार दिला आहे.