हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची स्थापना

पणजी – हिंदी साहित्य भारतीच्या गोवा समितीची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय विद्यालय मांडवीचे प्राचार्य रवि प्रताप सिंह यांची, तर दाबोळी येथील स्पेक्ट्रम करिअर अकादमीचे निर्देशक डॉ. कमलेश मिश्रा यांची सरचिटणीसपदी निवड झालेली आहे. या निवडीला हिंदी साहित्य भारतीच्या राष्ट्रीय निवड समितीने अनुमोदन दिले आहे. गोव्यातील ‘होली’ संघटनेचे अध्यक्ष कमलाकांत चतुर्वेदी यांनाही समितीच्या मार्गदर्शक मंडळात सहभागी करण्यात आले आहे.