|

मुंबई – देशभरात, तसेच राज्यात १ कोटी ते ८० लाख एवढ्या प्रचंड प्रमाणात बांगलादेशी घुसखोर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा गंभीर धोका निर्माण झाला आहे. गुन्हेगारी, सर्व प्रकारचे जिहाद यांमध्ये त्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यामुळे रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना सर्व ओळखपत्रे पुरवणार्या मोठ्या टोळ्या सक्रीय आहेत. महाराष्ट्र शासनाने ‘एस्.आय.टी.’ स्थापन केली आहे; मात्र याही पुढे जाऊन महाराष्ट्र शासनाने ‘शीघ्र कृती दल’ स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्राची बंगाल आणि आसाम यांच्यासारखी स्थिती होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवून, सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे ३ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक आणि अधिवक्ता राहुल पाटेकर उपस्थित होते.
श्री. कोचरेकर पुढे म्हणाले की, भारताच्या शासनाने गरिबासाठी राबवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनेक योजनांचा लाभ बांगलादेशी घुसखोर घेत आहेत. भारतियांच्या मुखातील अन्न ते ओढून घेत आहेत. अनेक ठिकाणी खोट्या कागदपत्रांच्या आधारे भूमी घेण्यात येत आहेत. धारावीतील लोकांचे पुनर्वसन करतांना तेथील बांगलादेशींचेही अधिकृतपणे पुनर्वसन होणार आहे. धारावीतील घुसखोरांना हाकलून केवळ इकडच्याच लोकांना सुविधा देण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धी पत्रक
बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात जनआंदोलन उभारणे आवश्यक ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक सनातन संस्था![]() आज अमेरिकेसारखे राष्ट्र घुसखोरांना बाहेर काढत असतांना भारताला घुसखोरांना पोसणे परवडणारे नाही. ही केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची समस्या नाही, तर संपूर्ण राष्ट्र आणि प्रत्येक भारतीय यांच्या समोरील समस्या आहे; कारण हे घुसखोर भारतियांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत आहेत. यांच्यामुळे मुंबईवर अतिरिक्त ताण येत आहे. एकही रुपयाचा कर न भरता सर्व पैसा ते त्यांच्या देशात पाठवत आहेत. कोट्यवधी घुसखोरांना बाहेर काढण्यास पोलिसांना मर्यादा आहेत. त्यामुळे ‘घरगुती कामगार, सुतार, बांधकामातील कामगार, भंगारवाले, शेजारी, व्यापारी आदी सर्वांमध्ये आढळणार्या बांगलादेशी घुसखोरांची माहिती सरकारला देणे आपले कर्तव्य आहे’, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. यातून इतके प्रंचड मोठे जनआंदोलन उभारले गेले पाहिजे, की घुसखोरांनी परत जाण्यासाठी सीमेवर रांगा लावल्या पाहिजेत. हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र येऊन हे राष्ट्रीय स्तरावर हे जनआंदोलन उभारतील. यामध्ये प्रत्येक स्थानकाबाहेर आंदोलने, सभा घेणे असे विविध उपक्रम आम्ही राबवणार आहोत. गृहमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘बांगलादेशी हटाओ, देश बचाओ’ असे जनआंदोलन छेडून देश घुसखोरमुक्त करण्यासाठी प्रयत्न करतील ! |
बाजारावरील आर्थिक आक्रमण ही बांगलादेशी घुसखोरांची काम करण्याची पद्धत ! – राहुल पाटकर, अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय
बांगलादेशी घुसखोर भाजीवाले ३ पट स्वस्त दराने कांदे, बटाटे किंवा भाजी विकतात. त्यामुळे महिला त्यांच्याभोवती गर्दी करतात. पायात फाटकी पादत्राणे घालणार्याला हे परवडते कसे ? याविषयी त्यांना ‘कोण पैसे पुरवतो ?’, असे विचारले, तर ते न बोलता पुढे जातात. बाजार चालू होण्यापूर्वी १ घंटा आधी ते १५ ते २० जणांच्या गटाने येतात. बाजारावरील आर्थिक आक्रमण करण्याची ही त्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ (काम करण्याची पद्धत) आहे. त्यांच्यामुळे सर्वच ठिकाणच्या सुरक्षेचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.