आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करून साधकाला पुढच्या टप्प्यात नेणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

एका प्रसंगी श्री. अभय वर्तक यांना मार्गदर्शन करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘मला नेहमी ‘आपले आहे, ते गुरूंचे आहे आणि गुरूंचे आहे, ते आपले आहे’, असा भाव असण्यामध्ये काय चूक आहे ?’, असे वाटत असे. तेव्हा माझ्या मनात ‘गुरूंचे जे जे आहे, त्यावर माझा मालकी हक्क आहे’, असा विचार नसे, तर ‘ते माझे आहे; म्हणून मी ते आत्मीयतेने वापरले पाहिजे’, असा माझा पहिला विचार असे.

जून २०२४ मध्ये माझी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘माझे जीवन सनातन संस्थेसाठी आहे. माझे जे जे आहे, ते सनातनचे आहे आणि सनातनचे जे आहे, ते माझे आहे.’’ त्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘सनातन संस्था आणि तुम्ही वेगळे नाही. तुम्ही एकच आहात.’’

त्यांचे बोलणे ऐकून माझा कंठ दाटून आला आणि माझ्याकडून पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. माझ्या अंतर्मनात श्री गुरूंनी त्या क्षणी माझ्या पहिल्या विचारातील अपूर्णता लक्षात आणून दिली. ‘माझा विचार अधिक योग्य प्रकारे कसा असायला हवा ?’, ते श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी माझ्या लक्षात आणून दिले. श्री गुरूंच्या या कृपेबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अभय वर्तक, प्रवक्ते, सनातन संस्था (१०.८.२०२४)