‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात यांपासून धर्माचे रक्षण व्‍हावे आणि पुन्‍हा एकदा हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यास कटीबद्ध होण्‍यासाठी भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वर येथे या शपथ ग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.

देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.

मदरशांना दिले जाणारे अर्थसाहाय्य बंद करावे ! – अधिवक्ता मोतिसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

देशभरातील सर्व कैद्यांची माहिती घेतल्यास त्यातील बहुतांश मुसलमान मदरशांतून शिकलेले असल्याचे समोर येते. यातून ‘मदरशांतून आतंकवादी सिद्ध होतात का ?’, हा प्रश्न उरणार नाही !

प्रेमळ, नम्र आणि संतांविषयी अपार भाव असलेले देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) !

सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.

VIDEO : आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करायला हवे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपत्काळात हिंदु समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हिंदूंच्या रक्षणासाठी हे कार्य करायला हवे. असेे करणे म्हणजे समाजऋण फेडण्यासारखेच आहे आणि यातून आपली साधनाही होणार आहे.

केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

हिंदु संघटनांनी मतभेद बाजूला ठेवून हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हावे ! – अतुल जेसवानी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु सेवा परिषद

आज हिंदु समाजात अभूतपूर्व जागरूकता निर्माण झाली आहे. याला आपण प्रतिकूल काळातील अनुकूलता म्हणू शकतो. अशा काळात जागरूक हिंदूंना राजकारणाकडे नाही, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला जागृती करावी लागेल.

हिंदूंनी मागणी केली, तरच हिंदु राष्ट्र मिळेल ! – परमहंस डॉ. अवधेशपुरीजी महाराज, स्वस्तिकपीठाधिश्वर, मध्यप्रदेश

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महाराष्ट्र समाज धर्मशाळेच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते, त्याचा संक्षिप्त वृत्तांत इथे देत आहोत . . .

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठीच छत्रपती शिवरायांना निधर्मी ठरवण्याचे राजकारण्यांचे षड्यंत्र ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवरायांना ‘सेक्युलर’ ठरवणे, हा त्यांच्या शौर्याचा अपमान आहे. त्यांचे ‘हिंदवी स्वराज्या’चे विचार अर्थात् ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे विचार कृतीत आणले पाहिजेत.

पंजाबला भारतापासून तोडण्यासाठी खलिस्तानवाद्यांना समवेत घेऊन शत्रूचे छुपे युद्ध चालू ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र

पंजाबमधील देशविरोधी तत्वांनी खलिस्तानवाद्यांसह देश-विरोधात सुरु केलेल्या ‘प्रॉक्सी वॉर’मध्ये ते कधी यशस्वी होणार नाहीत; कारण पंजाबमधील जनता भारतासमवेत आहे.