Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच गोव्याचे मुख्यमंत्री यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देतांना श्री. अभय वर्तक, त्यांच्या शेजारी मंत्री भरतशेठ गोगावले आणि श्री. सुनील घनवट

पणजी/मुंबई, २२ मार्च (वार्ता.) – रामराज्याची अनुभूती देणार्‍या ‘सनातन राष्ट्रा’च्या संकल्पाचा शंखनाद करून धर्मसंस्थापनेच्या कार्याला गती देण्याच्या उद्देशाने सनातन संस्था आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी अधिवक्ता राजेश गावकर, सनातन संस्थेचे तुळशीदास गांजेकर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि श्री. नारायण नाडकर्णी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देतांना  श्री. अभय वर्तक, आणि मंत्री भरतशेठ गोगावले

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना महोत्सवाचे निमंत्रण दिले. या वेळी महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे समन्वयक श्री. सुनील घनवट आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही श्री. वर्तक यांनी निमंत्रण दिले.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निमंत्रण देतांना अधिवक्ता राजेश गावकर, शेजारी डावीकडून सर्वश्री तुळशीदास गांजेकर, नारायण नाडकर्णी आणि रमेश शिंदे

विश्‍वकल्याणार्थ रामराज्यासम ‘सनातन राष्ट्रा’चे लक्ष्य निर्धारित करणारे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव सोहळा गोवा येथे यंदा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त १७ ते १९ मे या कालावधीत फोंड्यातील फर्मागुडी येथे असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला संत-महंत, मंत्री आणि मान्यवर यांच्यासह २० सहस्रांहून अधिक साधक आणि धर्मप्रेमी उपस्थित असणार आहेत.