कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे घोषित करावीत ! – अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री

कुंभमेळ्यात अनेकजण हरवले आहेत. हरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांमध्ये संबधित व्यक्ती हरवले आहेत की, दुर्घटनेचे बळी ठरले आहेत, ही शंका येत असल्याने सरकारने दुर्घनेतील मृतांची नावे घोषित करावीत.

कुंभक्षेत्री वसंत पंचमीच्या स्नानासाठी वैद्यकीय व्यवस्था सज्ज !

२९ जानेवारी या मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीनंतर कुंभक्षेत्री प्रशासन सतर्क झाले आहे.

१० महिन्‍यांनंतर भारताचा स्‍वतःचा ‘एआय चॅटबॉट’ सिद्ध होणार !

भारत पुढील १० महिन्‍यांत स्‍वतःचा आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स (ए.आय. – कृत्रिम बुद्धीमत्ता) चॅटबॉट सिद्ध करेल, अशी माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्‍विनी वैष्‍णव यांनी दिली.  वैष्‍णव पुढे म्‍हणाले की, एआयसाठी संगणकीय पायाभूत सुविधा सर्वांत महत्त्वाची आहे.

कुडाळमधील व्यक्तीची ४२ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

आर्थिक गुंतवणुकीतून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमीष दाखवून शहरातील अभिनवनगर येथील सतीश परशुराम नाईक यांची ४२ लाख ४१ सहस्र ४८३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली.

Prayagraj Kumbh Parva 2025 – HINDU RASHTRA ADHIVESHAN : महाकुंभपर्वात साधुसंतांचा धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

अर्जुनाला ‘फेक नेरेटिव्ह’मधून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला. वर्तमान काळातही हिंदु राष्ट्राच्या विरोधी ‘फेक नेरेटिव्ह’ निर्माण करून हिंदूंना भ्रमित केले जात आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व समजून घेतले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना करता येईल !

आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करून देशाबाहेर काढावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जगभरात बेकायदेशीर घुसखोरीमुळे अनेक गंभीर समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. आपल्‍या देशात बेकायदेशीर घुसलेल्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करून त्‍यांना देशाबाहेर काढले पाहिजे.

गुरांची तस्करी करणारा उस्मान खान याला तडीपार करा ! – गोप्रेमींची मागणी

गुरांची चोरी करून त्यांची अनधिकृतपणे हत्या केल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असलेला उस्मान खान याला सरकारने तडीपार करावे.

३ फेब्रुवारीला श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थानम् येथे सुवर्ण कळसारोहण, ध्‍वजस्‍तंभम् आणि मूर्ती प्राणप्रतिष्‍ठापना !

भावनाऋषी पेठ, जुन्‍या वालचंद महाविद्यालयासमोर ४५ वर्षांपूर्वी स्‍थापन झालेल्‍या श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थानम्‌चा सुवर्ण कळसारोहण सोहळा ३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.५० या शुभमुहुर्तावर होणार आहे.

म्हादई प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा प्रलंबित

गोवा सरकारने कर्नाटकच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केलेल्या म्हादई जलतंटा लवादाच्या अवमान याचिकेवर ३० जानेवारी या दिवशी सुनावणी होणार होती; मात्र ती होऊ शकली नाही.