Beawar Rajasthan LoveJihad Rate Card :  मुसलमानांकडून ब्राह्मण मुलीचा दर २० लाख आणि दलित मुलीचा दर १० लाख रुपये ठरण्यात आल्याचे उघड !

राजस्थानातील बेवार येथील अल्पवयीन हिंदु मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण

रिहान महंमद, सोहेल मन्सूरी, लुकमान, अरमान पठाण आणि साहिल कुरेशी

अजमेर (राजस्थान) – राजस्थानातील बेवार जिल्ह्यातील विजयनगरमध्ये धर्मांतराच्या प्रकरणात सातत्याने खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी १२ ते १५ मुसलमानांच्या टोळीला अटक केली आहे. या मुसलमानांनी अल्पवयीन शाळकरी मुलींना ब्लॅकमेल करायचे, लैंगिक शोषण करायचे आणि त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्याचा कट रचला होता. पीडित कुटुंबांनी या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. बेवारच्या प्रकरणात ब्राह्मण मुलीला जाळ्यात ओढण्यासाठी २० लाख रुपये, दलित मुलीसाठी १० लाख रुपये देण्यात येणार होते, असे उघड झाले आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी अशिक्षित आहेत. (अशिक्षित मुले गुन्हेगारी कृत्येच करणार, यात काय संशय ! – संपादक) या संपूर्ण प्रकरणाची तुलना वर्ष १९९२ च्या अजमेर ब्लॅकमेल प्रकरणाशी केली जात आहे, ज्यामध्ये अल्पवयीन हिंदु शाळकरी मुलींनादेखील लक्ष्य केले गेले होते.

१. एका पीडितेने आरोपी तरुणांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुलीच्या म्हणण्यानुसार त्या तरुणाच्या टोळीत अनेक मुले आहेत, जे कट रचून मुलींचे धर्मांतर करण्यात गुंतले होते. या मुलीला अडकवण्यासाठी मुले प्रतिदिन नवीन गाड्या आणत असत. कधी मोटारसायकल, कधी बुलेट अशी वेगवेगळी वाहने होती. ते लोक एकदा म्हणाले होते की, जर आम्ही ब्राह्मणाची मुलगी विकली, तर आम्हाला २० लाख रुपये मिळतील आणि जर आम्ही तुम्हाला (दलित) विकले, तर आम्हाला १० लाख रुपये मिळतील. (हे पैसे त्यांना कोण देणार होते ?, याचा शोध घेऊन ते समाजासमोर उघड केले पाहिजे ! – संपादक)

२. टोळीतील मुसलमानांनी मुलींवर त्यांचा धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला. या तरुणांनी या मुलींना ‘कलमा’ (अल्लाचा गौरव करणारी विधाने) म्हणण्याची आणि उपवास ठेवण्याचा दबाव निर्माण केला. यासाठी या मुलींची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवून ती प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली.

३. या प्रकरणी पोलिसांनी ३ गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये रिहान महंमद, सोहेल मन्सूरी, लुकमान, अरमान पठाण आणि साहिल कुरेशी यांचा समावेश आहे. पोलीस अजूनही पसार आरोपींचा शोध घेत आहेत.

अधिवक्त्यांकडून मुसलमान टोळीला पुन्हा मारहाण

अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी अजमेर पॉक्सो न्यायालयात उपस्थित केले असता तेथे अधिवक्त्यांनी त्यांना मारहाण केली. ४ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे या आरोपींना अधिवक्त्यांनी चोपले होते. या घटनेच्या वेळी पोलिसांसमवेत झटापट झाली. दुसरीकडे आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत सर्व समाज संघर्ष समितीने शहर बंद पाळला होता. या प्रकरणात ७ आरोपींव्यितरिक्त ३ अल्पवयीन मुलेही आरोपी आहेत.

संपादकीय भूमिका

गेल्या ४ दिवसांपासून हे प्रकरण राजस्थानमध्ये आणि देशात प्रसारित होत असतांना एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष किंवा नेते यांनी याविषयी तोंड उघडलेले नाही; कारण आरोपी मुसलमान आहेत आणि पीडित हिंदू !