बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करून देशाबाहेर काढावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

वणी येथील तहसीलदारांना निवेदन देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

वणी (यवतमाळ), ३१ जानेवारी (वार्ता.) – जगभरात बेकायदेशीर घुसखोरीमुळे अनेक गंभीर समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. आपल्‍या देशात बेकायदेशीर घुसलेल्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करून त्‍यांना देशाबाहेर काढले पाहिजे. अखंड भारताचे अनेकदा विभाजन झाले आहे, आणखी एक विभाजन टाळायचे असेल, तर घुसखोरीच्‍या समस्‍येवर उपाययोजना आवश्‍यक आहे. या मागणीचे निवेदन वणीचे तहसीलदार श्री. निखिल धुळधर यांना हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देण्‍यात आले.

या वेळी निवेदन देतांना श्रीराम आरती मंडळाचे वेदांत पिदूरकर, सनातन संस्‍थेचे लोभेश्‍वर टोंगे, श्री शिवप्रतिष्‍ठनचे मंगेश धोबे, भाजपचे अनुराग काठेड, सुरेंद्र मदान, संतोष नवघरे, धनराज खारकर आणि हिंदु जनजागृती समितीचे लहू खामणकर उपस्‍थित होते.