महापालिका आणि जलसंपदा विभागासमोर प्रश्नचिन्ह !
हडपसर (जिल्हा पुणे) – हडपसर परिसरातील बेबी कालव्यामध्ये (कॅनॉलमध्ये) जलपर्णीची वाढ झाली आहे. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात डासोत्पती होऊन साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कीटकनाशक फवारणी केली होती; पण जलपर्णीमुळे औषध फवारणीचा उपयोग होत नाही, असे निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्य विभागाने २ जानेवारीला जलसंपदा विभागाला जलपर्णी काढण्याची मागणी करणारे पत्र दिले; परंतु एकूणच तेथील परिस्थिती पहाता जलपर्णी कुणी काढायची ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॅनॉलच्या दोन्ही बाजूला झोपडपट्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. या लोकांकडून प्रतिदिन मोठ्या प्रमाणात घाण, कचरा आणि राडारोडा कॅनॉलमध्ये टाकला जातो. त्यामुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. कालव्याच्या बाजूची संरक्षक जाळीही लोकांनी तोडून टाकली आहे. जलसंपदा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रे उपलब्ध नाहीत. (हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) महापालिकेकडून कचरा व्यवस्थापन झाले नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेने जलपर्णी काढून कालवा स्वच्छ करावा, असे आहे.
संपादकीय भूमिका :स्मार्ट सिटी असणारे पुणे येथील प्रशासन यावर उपाययोजना का काढत नाही ? |