दावोसमध्ये ६ लाख २५ सहस्र ४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार !

दावोस (स्वित्झर्लंड) येथे जागतिक आर्थिक परिषद (‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’) चालू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली यंदा भारताने आपले सर्वांत मोठे शिष्टमंडळ त्यासाठी पाठवले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे

अभिनेते सैफ अली खान याच्यावरील बांगलादेशी आक्रमणकर्त्याला अरब देशात नोकरीसाठी जायचे होते. भारतात ‘एजंट’च्या साहाय्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र आणि व्हिसा बनवण्यासाठी ८० सहस्र रुपये लागणार होते.

सहस्रो भाविकांच्या उपस्थितीत श्रीरामकथेत पू. समाधान महाराज यांनी उभा केला श्रीराम जन्मोत्सव !

सांगलीतील कल्पद्रुम मैदानावर अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रथम वर्धापनानिमित्त होत असलेल्या श्रीरामकथा आणि नाम संकीर्तन सोहळ्यात पू. समाधान महाराज गेल्या ३ दिवसांपासून श्रीरामकथा सादर करत आहेत.

राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट ! 

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन सनातन संस्था निर्मित प्रभु श्रीरामाचे चित्र त्यांना भेट देण्यात आले.

नवी मुंबईत क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन !

‘क्रेडाई-बी.ए.एन्.एम्.’च्या ‘प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले आहे. २४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सीवूड्स, पाम बीच रस्ता,…

Prayagraj Kumbh Parva 2025 : कुंभक्षेत्री पदयात्रेद्वारे घुमला हिंदु राष्ट्राचा हुंकार !

अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा स्थापना सोहळ्याला २२ जानेवारी २०२५ या दिवशी १ वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभप्रसंगी हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी येथे ‘हिंदु राष्ट्र पदयात्रा’ काढण्यात आली. याद्वारे संपूर्ण कुंभक्षेत्री हिंदु राष्ट्राचा हुंकार घुमला.

मंदिरांच्या शेतभूमी बळकावल्या जाऊ नयेत; म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ लागू करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे निवेदन

मंदिरांचे आर्थिक व्यवस्थापन, धार्मिक उत्सव यांसाठी राजे-महाराजे यांच्यासह भाविक-भक्त यांनी देवस्थानांना शेतभूमी दान दिल्या होत्या, तसेच तत्कालीन मंदिर व्यवस्थापनानेही काही भूमी खरेदी केल्या होत्या.

शिंदे यांच्यावर टीका करतांना संजय राऊतांकडून नागा साधूंचा अवमान

धर्मातील उदाहरणे देण्याची सवय लागल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, याचे भानही नेत्यांना रहात नाही !

कोरेगाव पार्क येथील खासगी आस्थापनातील रोखपालाकडून २ कोटींचा अपहार

कोरेगाव पार्क येथील एका खासगी आस्थापनातील रोखपालाने २ कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी आस्थापनाचे मालक जिनेंद्र दोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोखपालाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘पसार’ कृष्णा आंधळे ‘वॉन्टेड’ घोषित !

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव ‘पसार’ आरोपी कृष्णा आंधळे याला बीड पोलिसांनी ‘वॉन्टेड’ म्हणून घोषित केले आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणार्‍यास योग्य ते पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे.