स्वीकृत नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे प्रकरण
पुणे – महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी मिळवून देण्यासाठी महापालिकेच्या अधिकार्यांकडून चक्क आयुक्तांचीच फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २ सप्ताहांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत माजी स्वीकृत सदस्यांच्या मागणीनुसार अडीच कोटी रुपयांच्या ५ निविदांना मान्यता देण्यात आली होती. या नगरसेवकांना प्रभागनिहाय निधी देतांना जुनी चालू असलेली कामे करण्यासाठी हा निधी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी आता आयुक्तांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले. या अधिकार्यांवर कारवाई करणार का ? असा प्रश्न आयुक्तांना विचारल्यानंतर ‘बघून सांगतो’, असे सांगून त्यावर बोलणे टाळले. आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, ‘‘प्रभागांतील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी (स्पिल ओव्हर) निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्यांनी दिली. त्यामुळे वर्गीकरण आणि इतर प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे.’’