Hindu Women Gang-Raped In Dhaka Bus : ढाका-राजशाही बसमध्ये २ हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचाराच्या घटना चालूच !

ढाका – बांगलादेशातील ढाका-राजशाही बसमध्ये मुसलमान गुंडांच्या टोळीने २ हिंदु महिलांना लक्ष्य करत त्यांचे दागिने आणि भ्रमणभाष लुटले आणि त्यानंतर बसमध्ये इतर प्रवाशांच्या समोरच त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. या महिलांना त्यांच्या पतींपासून वेगळे करण्यात आले आणि मागील आसनांवर नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांच्या पतींनी विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. बांगलादेश सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

१. बसमधील इतर प्रवाशांनी दरोडेखोरांच्या टोळीला वारंवार विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या धर्मांध टोळीने केवळ हिंदु महिलांनाच लक्ष्य केले आणि त्यांच्यावर बलात्कार केला.

२. दोन्ही पीडित महिला बराइग्राम येथे उतरल्यानंतर त्यांनी बराइग्राम पोलिसांना त्यांच्यावरील लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. या घटनेत बसचालक, साहाय्यक आणि पर्यवेक्षक यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील आणखी किती हिंदूंवर अत्याचार झाल्यावर भारत सरकार तेथील हिंदूंसाठी आक्रमक भूमिका घेणार ?