हिंदु राष्ट्र जागृती फेरी काढून हिंदु जनजागृती समितीचा कुंभमेळ्यात हिंदु राष्ट्राचा जयघोष !

मौनी अमावस्येच्या अमृतस्नान पर्वाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी हिंदु-राष्ट्र जागृती फेरी काढून कुंभमेळ्यामध्ये हिंदु राष्ट्राचा जयघोष केला.

४ – ५ जागांची शक्यता असतांना राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४२ जागा मिळणे यावर विश्‍वास बसेल का ? – राज ठाकरे, मनसे

जे इतकी वर्षे महाराष्‍ट्रामध्‍ये राजकारण करत आले, ज्‍यांच्‍या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्‍या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्‍यापलीकडची गोष्‍ट आहे.

काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा उद्धव ठाकरे यांनी अंगीकारली ! – मुख्‍यमंत्री

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची लांगूलचालनाची परंपरा अंगीकारली असून केवळ मतांच्‍या लाचारीसाठी त्‍यांच्‍या पक्षाने वक्‍फ बोर्ड विधेयकाला विरोध केला आहे, अशी टीका मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

श्री देवदेवेश्‍वर संस्‍थानकडून (पुणे) ‘श्रीमंत नानासाहेब पेशवे’ पुरस्‍कार घोषित !

‘श्री देवदेवेश्‍वर संस्‍थान’कडून सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्‍सव ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होईल.

एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्‍सवी वाढदिवस ‘श्री एकनाथ आध्‍यात्मिक सेवा वर्ष’ म्‍हणून साजरा करण्‍यात येणार !

शिवसेना नेते तथा उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हिरक महोत्‍सवी वाढदिवस ‘श्री एकनाथ आध्‍यात्मिक सेवा वर्ष’ म्‍हणून साजरा करण्‍यात येणार आहे. ‘शिवसेना धर्मवीर आध्‍यात्मिक सेने’कडून याविषयी घोषणा करण्‍यात आली आहे.

वर्धा येथे सनातन संस्‍थेकडून भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्‍मान !

महादेवपुरा येथील शिवमंदिरामध्‍ये मुझफ्‍फरपूर (उत्तरप्रदेश) येथील भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांच्‍या भागवत कथेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यानिमित्ताने सनातनच्‍या साधकांनी त्‍यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.

पुणे महापालिकेने अतिरिक्‍त पाणी वापरल्‍याने जलसंपदा विभागाने पाठवली थकबाकीची नोटीस !

महापालिकेलाच थकबाकीची नोटीस पाठवावी लागत असेल, तर प्रशासन अन्‍यवेळी कसा कारभार करत असेल ? याला उत्तरदायी असणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्‍यक !

सातारा येथील कोंडवे परिसरामध्‍ये गोळीबार !

कोंडवे परिसरातील पेट्रोल पंपाजवळ दुचाकीस्‍वारावर चालत्‍या गाडीतून गोळीबार करण्‍यात आला. या घटनेत एका युवकाच्‍या गुडघ्‍याला, तर दुसर्‍याच्‍या कमरेला गोळी लागली आहे. ही घटना सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यामध्‍ये चित्रीत झाली आहे.

सातारा येथे २ फेब्रुवारीला राज्‍यस्‍तरीय ज्‍योतिष अधिवेशन !

श्री स्‍वामी समर्थ गणेश चॅरिटेबल ट्रस्‍ट आणि मराठी ज्‍योतिषी महामंडळ यांच्‍या वतीने २ फेब्रुवारी या दिवशी एक दिवसाचे ‘राज्‍यस्‍तरीय ज्‍योतिष अधिवेशना’चे आयोजन केले आहे. हे अधिवेशन सुरभी मंगल कार्यालयामध्‍ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत होणार आहे.