Shocking Revelation CPC Board’s Report : गंगाजलाविषयी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अपूर्ण ! – वैज्ञानिक

प्रयागराज कुंभपर्व २०२५

अहवालात अनेक निकषांचा योग्य उल्लेख नसल्याची माहिती  

प्रा. उमेश कुमार सिंह (सौजन्य : ANI)

प्रयागराज – गंगाजलाविषयी केंद्रीय प्रदूषण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावर जवाहरलाल नेहरू विद्यापिठासह ३ विद्यापिठांतील पर्यावरण वैज्ञानिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, केंद्रीय प्रदूषण प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल अपूर्ण असून त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या निकषांचा स्पष्ट उल्लेखच केलेला नाही. गंगानदीचे पाणी अशुद्ध असून ते अंघोळीसाठी आणि पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केला होता.

१. अलाहाबाद विद्यापिठाच्या पर्यावरण विज्ञान केंद्राचे प्रा. उमेश कुमार सिंह म्हणाले की, अहवालात दाखवलेला पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचा स्तर चांगला आहे. त्यामुळे उपलब्ध माहितीच्या आधारे त्रिवेणी संगमचे पाणी अंघोळीला योग्य असल्याचे म्हणता येईल.

२. दक्षिण बिहार केंद्रीय विद्यापिठाचे साहाय्यक प्राध्यापक आर्.के. रंजन यांनी सांगितले की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील माहिती आणि वास्तविक स्थिती यांत मोठा भेद आहे. त्यामुळे ‘गंगाजल अंघोळीला अयोग्य आहे’, असा निष्कर्ष काढणे घाईगडबडीचे ठरेल.

३. जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या पर्यावरण विज्ञान विभागाचे साहायक प्राध्यापक डॉ. अमित कुमार मिश्रा यांनी सांगितले की, अमृत स्नानाच्या दिवसातील गंगाजलाचा अभ्यास केला, तर त्यात कोली बॅक्टेरिया उच्च स्तरावर आढळतो. त्यामुळे निश्चित निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी अधिक माहिती मिळवण्याची आवश्यकता आहे.

संपादकीय भूमिका

गंगानदीचे पाणी अशुद्ध असल्याचा खोटा अहवाल सादर करण्यामागे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुष्ट हेतू होता का, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !