श्री गणेशमूर्ती आणि कळसाची भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात सवाद्य मिरवणूक !

कागवाड (जिल्हा बेळगाव) येथे ‘श्री मांदार गणेश मंदिरा’च्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण सोहळा !

मिरवणुकीत महिलांनी कलश हाती घेतले होते

कागवाड (जिल्हा बेळगाव), २२ पेब्रुवारी (वार्ता.) – येथील पटवर्धन सरकार कुटुंबियांचे जागृत उपास्यदैवत असलेल्या श्री मांदार गणेश मंदिराच्या नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कळसारोहण समारंभास २० फेब्रुवारीपासून भावपूर्ण अन् उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. सायंकाळी ५ वाजता फुलांनी सजवलेल्या अश्वमेध रथातून श्री मांदार गणेशमूर्ती आणि कळस यांची गावातील बाजारपेठ मार्गे चावडी, नगरपालिका या मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी श्री गणेशाचा जयघोष करण्यात आला. अत्यंत प्राचीन असलेल्या या मंदिराची स्थापना वर्ष १८५५ (शके १९७७ मध्ये) मध्ये झाली आहे.

श्री गणेशमूर्ती आणि कलश

मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून डोक्यावर कलश घेतले होते. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी गावातील महिलांनी स्वागत करून रथातील श्री गणेशमूर्ती आणि कळस यांचे औक्षण करून भावपूर्ण दर्शन घेतले. गावातील सर्व स्त्री-पुरुष यांनी गणेशमूर्ती आणि कळस यांचे भावपूर्ण दर्शन घेतले. मिरवणुकीच्या वेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणुकीच्या वेळी गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मिरवणुकीनंतर आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

मिरवणुकीतील रथातील श्री गणेशमूर्ती आणि कलश यांचे महिला औक्षण करतांना उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली
याच अश्वमेध रथातून श्री गणेशमूर्ती आणि कळस यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
(मध्यभागी) अधिवक्ता समीर पटवर्धन आणि गावातील ग्रामस्थ मिरवणुकीत हलगी वाद्य वाजवण्यात आले

या वेळी अधिवक्ता समीर पटवर्धन, सर्वश्री जगदीश पटवर्धन, रवींद्र पटवर्धन, अरुण जोशी, तात्या भट, संजय शेडबाळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. सौरभ पाटील, श्री. जितेंद्र पाटील, भाग्यश्री पटवर्धन, समस्त कागवाडकर कुटुंबीय आणि पटवर्धन सरकार कुटुंबीय उपस्थित होते.