कुंभमेळ्यात झालेल्या दुर्घटनेतील मृतांची नावे घोषित करावीत ! – अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री

प्रयागराज, ३१ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात अनेकजण हरवले आहेत. हरवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांमध्ये संबधित व्यक्ती हरवले आहेत की, दुर्घटनेचे बळी ठरले आहेत, ही शंका येत असल्याने सरकारने दुर्घनेतील मृतांची नावे घोषित करावीत. अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ‘एक्स’वर पोस्ट प्रसारित करून केली आहे. यामुळे ज्यांची नावे घोषित होणार नाहीत, ते हरवले असून आज ना उद्या परत सापडतील, ही आशा त्यांच्या कुटुंबियांना असेल, असेही ते म्हणाले.