Pakistan releases 22 Indian Fishermen : पाकने २२ भारतीय मासेमारांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर केली सुटका

पाकिस्तानने २२ भारतीय मासेमारांची सुटका केली

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने २२ भारतीय मासेमारांची सुटका केली आहे. हे मासेमार कराचीतील मालीर कारागृहात होते. त्या सर्वांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे. कारागृहातून बाहेर आल्यानंतर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांना भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया चालू केली आहे. या मासेमारांना लाहोरहून अटारी सीमेमार्गे अमृतसरमधील भारतीय अधिकार्‍यांकडे सोपवले जाईल. हे भारतीय मासेमार चुकून सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानी समुद्रात पोचले होते. (भारतीय मासेमार सातत्याने चुकून पाक आणि श्रीलंका यांच्या सीमेत प्रवेश करत असतांना सरकार त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का काढत नाही ? – संपादक) यानंतर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांना अटक करून कारागृहात पाठवले.