बंदी घालण्यात आलेली आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) चा कट
नवी देहली – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेचा एक नवीन कट उघडकीस आला आहे. याअंतर्गत ही संघटना राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीपासून (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सपासून -एन्आर्सीपासून) वाचण्यासाठी झारखंडमधील आदिवासी मुलींशी विवाह करत आहेत. हे षड्यंत्र राबवण्यासाठी या संघटनेने राज्यात १० सहस्र एकरपेक्षा अधिक भूमी खरेदी केली आहे. गुप्तचर विभागाने या संदर्भातील अहवाल पोलीस महासंचालकांना पाठवला आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे ?
गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, पीएफ्आयवर बंदी घालण्यात आल्यानंतरही संथाल भूमी म्हणून ओळखल्या जाणार्या पाकूर, जामतारा, गोड्डा आणि साहेबगंज जिल्ह्यांमध्ये या संघटनेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. राजमहल, उधवा, बरहेत आणि तलझारी ब्लॉकमधील अयोध्या, जोगटोला, वृंदावन, बालुग्राम, करमटोला, महाराजपूर, तीन पहाड बाजार, जोंका, गंगाटिया आणि पदरकोला यांसारख्या गावांमध्ये जिहाद्यांनी वेगाने भूमी खरेदी केल्या आहेत. अनेक गावांमध्ये, त्यांनी शस्त्रांचा वापर करून लोकांच्या भूमींवर बलपूर्वक नियंत्रण मिळवले आहे. धाक दाखवून, कवडीमोल किमतीत भूमी खरेदी करण्यात आल्या. पीएफ्आय केवळ त्यांच्या स्वतःच्या सदस्यांद्वारे आदिवासी समुदायाच्या भूमींवर नियंत्रण मिळवत नाही, तर बांगलादेशी घुसखोरांना झारखंडमध्ये त्यांच्या भूमी एकत्रित करण्यासाठी आणि जंगम अन् स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी निधीदेखील देत आहे.
पीएफ्आय जिहादी आतंकवाद्यांसाठी मार्ग सिद्ध करत आहे !
पीएफ्आयचे जिहादी कार्यकर्ते एका कटाचा भाग म्हणून झारखंडमधील आदिवासी समुदायातील मुलींना फसवत असून त्यांच्याशी विवाह करत आहेत, जेणेकरून ते आतंकवाद्यांना भारतातील इतर राज्यांमध्ये सुरक्षित प्रवेश मिळावा, यासाठी एक मार्ग सिद्ध करू शकतील. आतापर्यंत १२ सहस्रांहून अधिक मुलींना पीएफ्आयच्या कार्यकर्त्यांनी फसवून त्यांच्याशी विवाह केले आहे.
संपादकीय भूमिकाअसे होईपर्यंत सरकार, प्रशासन, पोलीस झोपले होते का ? ते आता यावर काय कारवाई करणार आहेत ? कि झारखंड दुसरे पाकिस्तान होणार आहे ? यांची कोण उत्तर देणार ? |