
सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – सध्या मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्या धर्मप्रचारक सद़्गुरु स्वाती खाडये यांनी केले. येथील नटराज मंदिराच्या प्रांगणामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रवचनांमध्ये त्या बोलत होत्या. ‘धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु धर्मियांची स्थिती केविलवाणी झाली आहे. यासाठी जिज्ञासूंनी सनातनच्या साधना सत्संगांना यावे. तेथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल’, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेचे ग्रंथ आणि उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कार्यक्रमाचा लाभ सातारा आणि पंचक्रोशीतील ५०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.