US Deports Illegal Indians : अमेरिकेत बेकायदेशीर रहाणारे आणखी ११२ भारतीय भारतात परतले

अमृतसर (पंजाब) – अमेरिकेत बेकायदेशीरपणे रहाणार्‍या भारतियांची तिसरी तुकडी १६ फेब्रुवारीला रात्री १० वाजता अमृतसर विमानतळावर उतरली. अमेरिकेच्या वायूदलाच्या सी-१७ ए ग्लोबमास्टर विमानातून ११२ भारतीय येथे पोचले. यामध्ये हरियाणातील ४४ आणि पंजाबमधील ३३ जणांचा समावेश आहे. विमानतळावर त्यांची चौकशी करण्यात आली. अमेरिकेतून एकूण १८ सहस्र भारतियांना परत पाठवले जाणार आहे. यांतील अनुमाने ५ सहस्र लोक हरियाणातील आहेत. आतापर्यंत एकूण ३३५ भारतियांना परत पाठवण्यात आले आहे.