|
पुणे – हडपसर भागातील ‘मार्व्हल बाऊंटी को-ऑप. सोसायटी’तील ९ व्या मजल्यावरील सदनिकेमध्ये गेल्या ५ वर्षांपासून ३५० मांजरे पाळल्याचे समोर आले आहे. येत्या ४८ घंट्यांमध्ये मांजरी हालवण्यात याव्यात, अशी नोटीस संबंधित सदनिकाधारकाला पुणे महापालिकेच्या पशू संवर्धन अधिकार्यांनी दिली आहे.
मांजरांची देखभाल करण्यासाठी ५ ते ६ कामगारही ठेवण्यात आले आहेत. त्याचा त्रास इतर सदनिकाधारकांना होऊ लागल्यानंतर त्यांनी सदनिकेच्या मालकाकडे तक्रार केली. मालकाने तक्रारीकडे लक्ष दिले नाही. अखेर नागरिकांना अनेक समस्यांनी हैराण झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिकेकडे तक्रार केली. महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी आले. त्या सदनिकेमध्ये ३५० मांजरे असल्याचे निष्पन्न झाले.
वसाहतीतील नागरिकांनी २०२० मध्ये महापालिका आणि पोलीस यांकडे तक्रार केली होती. त्या वेळी संबंधित महिलेकडे ५० मांजरे असल्याचे समोर आले होते; परंतु गेल्या ५ वर्षांमध्ये हा आकडा ३५० वर पोचला असल्याचे निष्पन्न झाले. |