विवाह सोहळ्‍यात अध्‍यात्‍मप्रसार करणारा इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील आदर्श भंडारे परिवार !

विवाह सोहळ्‍यात लावण्‍यात आलेले सनातनचे ग्रंथप्रदर्शन

इंदूर (मध्‍यप्रदेश) – सध्‍या विवाह हा विधींपेक्षा मनोरंजन, प्रसिद्धी आणि प्रतिष्‍ठा यांचा विषय बनला आहे. अशा वेळी काही मोजके धर्मनिष्ठ परिवार असे असतात की, जे लग्नविधींना प्राधान्य देत समाजासमोर एक आदर्श निर्माण करतात. अशांपैकी येथील भंडारे परिवारातील तरुण कीर्तनकार श्री. ऐवज भंडारे यांनी त्यांच्या लग्नात अध्यात्मप्रसाराला प्रोत्साहन देऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी लग्नात येणार्‍या नातेवाइकांना जीवनासाठी उपयुक्त आध्‍यात्मिक ग्रंथ आणि पूजासाहित्य मिळावे, यासाठी सनातन संस्थेला आमंत्रित केले अन् संस्थेचे आध्‍यात्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यास सांगितले. त्यांचे या प्रयत्नांचे लग्नाला उपस्‍थित अनेकांनी कौतुक केले. या वेळी श्री. ऐवज यांच्या नातेवाइकांनी सांगितले, ‘या प्रकारचे ग्रंथप्रदर्शन पाहून त्यांना चांगले वाटले.’ या प्रसंगी तेथे आलेल्या दोन मंदिरांच्या पदाधिकार्‍यांनी संस्थेचे कार्य समजून घेतले आणि त्यांच्या मंदिरांमध्‍ये अध्यात्मप्‍रसारासाठी संस्थेला आमंत्रित केले.