मलकापूर (बुलढाणा) येथे कॅफेत अत्याचार
बुलढाणा – मलकापूर येथील ‘हँग आऊट’ कॅफेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. मुलीला महिन्याभरापूर्वी समीर देशमुख याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. पीडितेने पालकांसह अत्याचाराची कथा पोलीस ठाण्यात सांगितल्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कॅफेतून बाहेर आल्यावर मुलीवर परत अत्याचार करून तिची छायाचित्रे काढून तिला धमकावण्यात आल्याचेही मुलीने सांगितले.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थ, अत्याचार यांचे स्थान होणार्या कॅफेंचे अस्तित्व ठेवायचे का ? |
कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून अंगठा कापला
मुंबई – जुहू चौपाटी येथे अंगावर आलेल्या कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून २६ वर्षीय तरुणाचा अंगठा कापण्यात आला. आरोपीने तक्रारदावर चाकूने वार केले. पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला. खाद्यपदार्थ विकणार्या या टपरीवरील कुत्रा भुंकत गिरी यांच्या अंगावर आला. घाबरलेल्या गिरी यांनी खुर्ची उचलली आणि कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तेथून एक चाकू उचलून गिरी यांच्यावर सपासप वार केले.
महाकुंभसाठी मुंबईहून विशेष गाड्या सुटणार
मुंबई – कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे जाणार्या भाविकांना विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून ४२ विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. इतर रेल्वे विभागांद्वारे चालवल्या जाणार्या अधिकच्या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या स्थानकांवरून जातील. त्यामुळे प्रवाशांना आणखी सुविधा उपलब्ध होईल.
कोळशावरील तंदुरी रोटीवर बंदी
मुंबई – ढाबे, रेस्टॉरंट, हॉटेल येथे कोशावण तंदुरी रोटी भाजली जात असेल, तर अशा भट्ट्यांवर प्रदूषणामुळे बंदी घातली आहे. कोळशावरील तंदुरी रोटी वापरणार्या २०० हून अधिक हॉटेलना महापालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांना ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली असून इलेक्ट्रिक शेगडी किंवा गॅस वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबई – सी वुड्स भागातील माजी नागरसेवक भरत जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. घटनेपूर्वी स्वतःची व्यथा व्हिडिओद्वारे सांगितली. मालमत्ता खरेदी-विक्री रखडलेले प्रकल्प, घेतलेले कर्ज, त्याचे व्याज आदींविषयी व्यथा मांडली. त्यात फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले.