इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

सनातनच्‍या प्रदर्शनातील ग्रंथ पहातांना जिज्ञासू

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्रे

१. सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आलेले जिज्ञासू श्री. वैभव मुंगरे प्रदर्शनाच्‍या तीनही दिवस त्‍यांच्‍या मित्रांना प्रदर्शनावर घेऊन आले आणि त्यांना संस्थेचा परिचय करून दिला.

२. एका जिज्ञासूने ‘शाळांमध्‍ये सनातनचे ग्रंथ ठेवण्‍यासाठी प्रयत्न करीन’, असे स्‍वत:हून सांगितले.

३. भाजपचे नगरसेवक प्रशांत बडवे यांनी संस्‍थेच्‍या कार्याने प्रभावित होऊन ग्रंथप्रदर्शनाला विनामूल्‍य जागा उपलब्‍ध करून दिली.