इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने १६ फेब्रुवारीच्या रात्री अफगाणिस्तानातील कथित आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर हवाई आक्रमण केले. पक्तिका, बरमल भागासह उत्तरी वजीरिस्तानच्या शवालमध्ये पाकच्या वायूदलाच्या विमानांनी बाँबचा वर्षाव केला. त्याच वेळी नंगरहारच्या लालपूर जिल्ह्याच्या सीमेवर अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात चकमक उडाली. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानातील पक्तिका प्रांताच्या बरमल जिल्ह्यात केलेल्या हवाई आक्रमणात ४६ जण ठार झाले होते.