वर्धा येथे सनातन संस्‍थेकडून भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्‍मान !

पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्‍मान करतांना सौ. शिल्‍पा पाध्‍ये

वर्धा, ३० जानेवारी (वार्ता.) – महादेवपुरा येथील शिवमंदिरामध्‍ये मुझफ्‍फरपूर (उत्तरप्रदेश) येथील भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांच्‍या भागवत कथेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यानिमित्ताने सनातनच्‍या साधकांनी त्‍यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी सनातन संस्‍थेच्‍या सौ. शिल्‍पा पाध्‍ये यांनी श्रीफळ आणि पुष्‍पहार अर्पण करून त्‍यांचा सन्‍मान केला, तसेच त्‍यांना ‘इतिहास, संस्‍कृती रक्षण’ ग्रंथ, हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’ आणि सनातनची सात्त्विक उत्‍पादने भेट स्‍वरूपात दिली. याप्रसंगी पू. गंगोत्री तिवारी महाराज यांच्‍यासमवेत त्‍यांच्‍या धर्मपत्नी उपस्‍थित होत्‍या.

या वेळी पू. महाराज म्‍हणाले, ‘‘आपल्‍याला जे मिळाले, त्‍यात समाधान मानले पाहिजे. आपण संतुष्‍ट असेल, तरच आपल्‍याला आनंदी रहाता येते. सनातन धर्माचा प्रचार पुष्‍कळ झाला पाहिजे; कारण सनातन हिंदु धर्मातच परिपूर्णता आहे.’’