अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांचे ‘ऑपरेशन क्लिनअप’ !
नाशिक – गंगापूर रोड येथे मद्यधुंद युवती आणि युवक यांनी पोलिसांशी अरेरावी केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली, तसेच पोलीस निरीक्षकांचे स्थानांतर केले. त्यानंतर १० युवक-युवतींवर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर शहारात रात्री उशिरापर्यंत चालणारी इमारतींच्या छतांवरील हॉटेल्स, ऑर्केस्ट्रा (वाद्यवृंदाचा कार्यक्रम), हुक्का पार्लर (समूहाने द्रवजन्य सुगंधी तंबाखू सेवन करण्याचे ठिकाण), क्लब यांच्यावर कारवाई करण्यास आरंभ केला. पोलिसांनी याला ‘ऑपरेशन क्लिनअप’ असे नाव दिले आहे. पहिल्या दिवशी २५ हून अधिक कॅफे आणि हॉटेल चालक यांना नोटीस बजावण्यात आल्या. नियमबाह्य बांधकाम केलेल्या उपाहारगृहांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ‘शहरातील सर्व बार, मद्याची दुकाने आदी नियोजित वेळेत बंद करा. हुक्का पार्लर तातडीने कारवाई करा. विनापरवाना परमीट रूम, ऑर्केस्ट्रा आदींवर ध्वनीप्रदूषणाचे गुन्हे नोंद करा’, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त संदीप किणी यांनी दिले. नाशिकमध्ये एम्.डी., गांजा, अफू, कोकेन यांसारख्या अमली पदार्थांची उघड विक्री आणि सेवन होत असून अनेक पब, क्लब, हॉटेल, हुक्का पार्लर येथे हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येत आहे.
हिंदु जनजागृती समितीने दिले होते निवेदननाशिकमध्ये व्हिडिओ प्रसारित झाल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त यांना नाशिक शहरातील नशेच्या वाढत्या समस्येवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या संदर्भात निवेदन देऊन ते रोखण्यासाठी आंदोलन केले होते. नाशिकच्या युवकांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी नाशिक शहाराला अमली पदार्थांच्या सेवनाचा अड्डा बनलेला पंजाब होण्यापासून वाचवावे, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली होती. |
महापालिकेसमवेत कारवाई !
पोलिसांनी महानगरपालिकेच्या समवेत सार्वजनिक शांततेचा भंग करणारे उशिरापर्यंत चालू असणारे क्लब आणि हॉटेल्स यांच्यावर कारवाई केली. विविध हॉटेलांचे अनधिकृत बांधकाम या वेळी पाडण्यात आले. कॉलेज रोड आणि गंगापूर रोड परिसरात कारवाई करण्यात आली. गंगापूर पोलीस ठाण्याने ही कारवाई केली.
संपादकीय भूमिका
|