Delhi Earthquake :  देहलीला पहाटे बसले भूकंपाचे धक्के

नवी देहली – येथे १७ फेब्रुवारीच्या पहाटे ५.३६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. ४ रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र देहलीतच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केवळ ५ किमी खाली होते. भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांत राहण्याचे, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि संभाव्य धक्क्यांसाठी (आफ्टरशॉकसाठी) सतर्क रहाण्याचे आवाहन केले. तसेच अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचीही माहिती त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत दिली.