कर्नाटकातील मंदिरांत २२ जानेवारीला विशेष पूजा करण्यात चूक काय ?

काँग्रेसवाल्यांना खर्‍या अर्थाने हिंदु धर्माविषयी, मंदिरांविषयी आत्मियता असती, तर त्यांच्या कृतीतूनही ती नेहमीच दिसून आली असती !

डॉक्टरांनी अहवाल आणि औषधांची चिठ्ठी लिहितांना सुवाच्च अक्षर काढण्यासाठी परिपत्रक काढा !

डॉक्टरांनी चिठ्ठी लिहितांना ती सुवाच्च अक्षरांत लिहावी, यासाठी न्यायालयाला सरकारला परिपत्रक काढण्याचा आदेश द्यावा लागणे, हे डॉक्टरांसाठी लज्जास्पदच होय !

Hollow Warning Pakistan Interim PM : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीच्या काळात आक्रमण केल्यास प्रत्युत्तर देऊ !’ – पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान काकर

पाकिस्तान उसने अवसान आणून अशा प्रकारचे विधान करत आहेत, हे जगाला दिसत आहे. पाक आता स्वतःच्या कर्मानेच नष्ट होणार असल्याने त्याच्यासाठी अन्य कुणी काही करण्याची आवश्यकता नाही, ही वस्तूस्थिती आहे !

श्रीराममंदिरातील पहिल्या सुवर्ण दरवाजाचे छायाचित्र प्रसारित !

श्रीराममंदिरात एकूण ४६ दरवाजे बसवले जाणार आहेत. यांपैकी ४२ दरवाजांना १०० किलो सोन्याने लेपन केले जाणार आहे.

Sambhajinagar Bench Order : नायलॉन मांजा जप्तीसाठी राज्यभर धडक कारवाई करा !

असा आदेश न्यायालयाला का द्यावा लागतो ? सर्व यंत्रणा हाताशी असतांना प्रशासन आणि पोलीस स्वतः नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्यांवर कठोर कारवाई का करत नाहीत ?

Developed India : भारत विकसित राष्ट्र झाल्यासच त्यातून राष्ट्रपूजा होईल ! – अनुरागसिंह ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री

भारताचा अमृतकाळातून सुवर्णकाळात प्रवेश होत आहे, तसेच देशाची विकसित राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. भारत विकसित राष्ट्र झाल्यासच त्यातून राष्ट्रपूजा होणार आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण तथा क्रीडा अन् युवक कल्याण मंत्री अनुरागसिंह ठाकुर यांनी म्हटले आहे.

Encroachment On Vishalgad : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी निधी देण्यात आला आहे ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

राज्यातील ऐतिहासिक वारसा टिकला पाहिजे, यासाठी सांस्कृतिक विभागाकडून प्रयत्न चालू आहेत. राज्यातील ३८६ वास्तू पुरातत्व विभागाकडे घेण्यात आल्या आहेत.

Maldives Appeals China : तुमच्या पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवा ! – मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू

आर्थिक बहिष्कार हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, हे यातून पुन्हा एकदा लक्षात येते ! हिंदूंनी आता हिंदुद्वेष्ट्यांवरही याचा प्रयोग करणे आवश्यक ठरले आहे !

UN Confirmed : आतंकवादी हाफीज सईद पाकच्या कारागृहात ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहे ! – संयुक्त राष्ट्रे

लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईद पाकच्या कारागृहात ७८ वर्षांची शिक्षा भोगत आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिबंध समितीने दिली आहे. हाफिज सईद १२ फेब्रुवारी २०२० पासून कारागृहात आहे.

Madarsa Teachers Honorarium Stopped : उत्तरप्रदेश सरकारकडून मदरशांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन रहित !

उत्तरप्रदेश सरकारने मदरशांचे आधुनिकीकरण करण्याच्या योजनेद्वारे तेथील शिक्षकांना देण्यात येणारे अतिरिक्त मानधन केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद केले आहे.