Tara Shahdeo Slams Ravish Kumar : ‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ म्हणणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज सहदेव यांनी फटकारले !

तुमच्यासारख्या लोकांमुळे जिहाद्यांचे धारिष्ट्य वाढते ! – तारा सहदेव

राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव व हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार

देहली – ‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ संबोधणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव यांनी फटकारले आहे. तारा सहदेव या लव्ह जिहादला बळी पडल्या होत्या. तारा सहदेव यांनी ‘एक्स’वर त्यांचे मत मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘रकीबुलसारख्या जिहाद्याने धर्मांतरासाठी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ‘लव्ह जिहाद’द्वारे त्याने मला लक्ष्य केले. ‘असे क्रूर कृत्य करण्याचे धाडस त्याच्यात कुठून आले ?’, हे मला समजू शकले नाही. आज मला समजले की, तुमच्यासारख्या लोकांमुळेच रकीबुलसारख्या जिहाद्यांचे धारिष्ट्य वाढते.’

लव्ह जिहादला बळी पडलेल्या तारा सहदेव !

रकीबुल हसन याने ‘रणजीत कोहली’ असे भासवून तारा सहदेव यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तारा सहदेव यांना त्याचे खरे स्वरूप कळल्यावर त्याने त्याला विरोध केला. त्या वेळी रकीबुल आणि त्याचे कुटुंबीय यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. हे प्रकरण २०१४ मध्येच उघडकीस आले. वर्ष २०१५ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘सीबीआय’ने अन्वेषण चालू केले होते. या प्रकरणात रकीबुलला रांची येथील ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षाही सुनावली होती. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन निबंधक मुश्ताक अहमद यालाही १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

‘लव्ह जिहाद’ला काल्पनिक संबोधणार्‍या रवीश कुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

साम्यवादी आणि हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी ‘एक्स’वर एक छायाचित्र प्रसारित केले. यामध्ये त्यांनी ‘लव्ह जिहाद आणि इतर काल्पनिक कथा’ नावाच्या पुस्तकाचे कौतुक केले आणि एकप्रकारे ‘लव्ह जिहाद’ काल्पनिक असल्याचा प्रचार केला. तारा शाहदेव यांना ते सहन झाले नाही आणि तिने रवीश कुमारला सडेतोड उत्तर दिले.

संपादकीय भूमिका

भारत सरकारने लव्ह जिहादला राष्ट्रीय समस्या घोषित करून या समस्येला न मानणार्‍यांवरही कठोर कारवाई करावी. असे केले, तरच जिहाद्यांचे समर्थन करणार्‍यांवर जरब बसेल !