Lion Akbar Lioness Sita Row : ‘अकबर’ सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवल्यावरून विहिंपकडून न्यायालयात याचिका !

बंगाल राज्य सरकारच्या वन विभागाने ही नावे ठेवल्याचा आरोप !

कोलकाता (बंगाल) – राज्यातील सिलीगुडी येथील प्राणी संग्राहलयात ‘अकबर’ नावाच्या सिंहाला ‘सीता’ नावाच्या सिंहिणीसमवेत ठेवण्याचा अश्‍लाघ्य प्रकार समोर आला आहे. विश्‍व हिंदु परिषदेच्या बंगाल विभागाने यास हिंदु धर्माचा अपमान असल्याचे सांगून या विरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.

या याचिकेवर २० फेब्रुवारी या दिवशी सुनावणी करण्यात येणार आहे. सिंहाच्या जोडीचे नाव पालटण्यात यावे, अशी मागणी याचिकाकर्त्या विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या सिंह-सिंहिणीच्या जोडीला १३ फेब्रुवारी या दिवशी त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी संग्रहालयातून आणण्यात आले होते. ‘आम्ही सिंहांची नावे पालटली नाहीत. ती आधीच देण्यात आली होती’, असा दावा बंगाल सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या वन विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकरणात राज्याचे वन अधिकारी आणि सफारी पार्क संचालकांना पक्षकार करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

चित्रपटांच्या माध्यमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन देणे संतापजनक असतांना आता या घृणास्पद प्रकारामागील कारस्थान समोर आले पाहिजे !