मुंबईत ८०, तर नागपूर येथे २५ महिला देहव्यापार करतांना आढळल्या !

  • पोलिसांच्या संकेतस्थळावरून माहिती उघड
  • अल्पवयीन मुलींचाही यात समावेश
प्रतिकात्मक चित्र

नागपूर – राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढत आहे. गेल्या ११ महिन्यांत मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापाराच्या कारवाया नागपूर येथे करण्यात आल्या. मुंबईत २६ देहव्यापाराच्या अड्ड्यांवर धाडी घालून ८० महिलांना कह्यात घेण्यात आले. यामध्ये १३ आणि १४ वर्षांच्या २ मुलींचाही समावेश आहे. तरुणींकडून देहव्यापार करवून घेणार्‍या ३५ महिला आणि पुरुष दलालांना अटक करण्यात आली. नागपूर येथे ६६ तरुणी देहव्यापाराच्या जाळ्यात अडकलेल्या आढळल्या. यात १४ ते १५ वर्षे वयोगटातील ४ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ही धक्कादायक माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून उघड झाली आहे.

मुंबई, नागपूर आणि पुणे येथे सौंदर्यवर्धनालय (ब्युटीपार्लर) आणि स्पा-मसाज पार्लर यांच्या नावाखाली देहव्यापार होत असतो. देहव्यापार करणार्‍या ६० पेक्षा अधिक दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.

संपादकीय भूमिका :

नीतीमत्तेचे अधःपतन झाल्याने अशा घटनांना ऊत येतो ! ही स्थिती पालटण्यासाठी नैतिकता जपणारे शिक्षण देणे अपरिहार्य आहे !