रांची (झारखंड) – झारखंड आणि बिहार राज्यांत श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्याच्या घटना घडल्या. मिरवणूक मशिदीजवळ आल्यानंतर तेथे वाद होऊन नंतर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केल्याने या घटना घडल्या.
१. झारखंडमधील मिरवणुकांना मुसलमानांचा विरोध !
चोगाखार गावामध्ये मिरवणुकीवर दगडफेक
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील चोगाखार गावामध्ये १६ फेब्रुवारी या दिवशी काढण्यात आलेली मिरवणूक मशिदीजवळ आल्यावर मुसलमानांनी तिला विरोध केला. या लोकांमध्ये शहाबुद्दीन अन्सारी, हबीब, आझाद यांच्यासह अनेकांचा समावेश होता. त्यांनी मिरवणुकीतील ध्वनीक्षेपक बंद करण्यात सांगितला. त्याही स्थितीत हिंदूंनी मिरवणूक चालू ठेवली. पोलिसांनी हिंदूंना वेगाने मिरवणूक पुढे नेण्यास सांगितले. त्याच वेळी मशिदीच्या आजूबाजूच्या घरांमधून मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. दगडफेक करणार्यांमध्ये लहान मुले, वृद्ध आणि महिला यांचाही समावेश होता. (हे मुसलमान स्वतःला भारतात असुरक्षित समजतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न करतांना २ पोलीस आणि अन्य ८ जण घायाळ झाले. प्रशासनाने ध्वनीक्षेपक बंद करून मिरवणूक थांबवली. अतिरिक्त पोलीस आल्यावर परिस्थिती नियंत्रणात आणता आली. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
गावाचे सरपंच विनोद यादव म्हणाले की, हे प्रकरण दडपण्यासाठी प्रशासनाने हिंदूंवरही गुन्हा नोंदवला आहे आणि यात माझेही नाव घातले आहे. माझा या घटनेशी काहीही संबंध नव्हता. दोन्ही पक्षांवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी प्रशासनाने हे कृत्य केले आहे. (झारखंड मुक्ती मोर्चाचे हिंदुद्वेषी सरकार ! – संपादक)
रांची येथे मुसलमानांमुळे वाद !
रांचीच्या नागदी येथे १६ फेब्रुवारी या दिवशी मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी मशिदीजवळ वाद झाला. त्यानंतर धर्मांध मुसलमानांनी मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच लाठ्या-काठ्यांद्वारे आक्रमण करत गोळीबारही केला. पोलिसांनी गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिललेला नाही. या घटनेत १२ हून अधिक जण घायाळ झाले. या वेळी लाठीमार करण्यात आला. सध्या येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
२. बिहारमध्येही तणाव
तहबलपूर मंडल टोला येथे हिंदूंनीही दिले प्रत्युत्तर
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील तहबलपूर मंडल टोला येथील मुसलमानबहुल संकुलातून हिंदूंची मिरवणूक जात असतांना त्यावर दगडफेक करण्यात आली. यात देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचाराची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरभंगा येथे मशिदीच्या छतावरून दगडफेक
बिहारच्या दरभंगा येथील बेनीपूरबहेरा या भागातही धर्मांधांकडून मिरवणुकीवर मशिदीच्या छतावरून दगडफेक करण्यात आली. या घटनेपासून पोलीस ठाणे काही अंतरावर असतांनाही ही दगडफेक करण्यात आली. (धर्मांधांवर पोलिसांचा वचक नसल्याचा परिणाम ! – संपादक) यात १८ हून अधिक जण घायाळ झाले. पोलिसांनी काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेच्या १ दिवस आधी कसाई टोला या भागातही धर्मांध मुसलमानांनी मिरवणुकीवर आक्रमण केले होते.
Fanatical Mu$|!m$ attack Shri Saraswati Devi murthi immersion procession in #Bihar and #Jharkhand
👉 The religious processions of Hindus are always attacked near m@$j!d$, But no government ever takes concrete and effective measures to stop these attacks. This dire situation… pic.twitter.com/v8Ip0iPVUr
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 18, 2024
संपादकीय भूमिका
|