आजपासून पंडित धीरेंद्रशास्त्री महाराज यांच्या हनुमंत कथेला प्रारंभ !
जळगाव – येथील धरणगाव येथील तालुक्यातील झुरखेडा येथे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रशास्त्री महाराज यांच्या हनुमंत कथेला प्रारंभ होणार आहे. २६ ते ३० डिसेंबर असे ५ दिवस कथेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कथेसाठी ३ लाख भाविकांची उपस्थिती असणार आहे. जळगाव एस्.टी. महामंडळाने ८ ठिकाणांहून बससेवा उपलब्ध करून दिली आहे.
१ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी !
मुंबई – मुंबई पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीसाठी मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. नाकाबंदीमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणारे वाहनचालक, तसेच मध्यरात्री फिरणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर कारवाई करण्यात आली.