‘शिवजयंती महोत्सवा’च्या तपपूर्तीनिमित्त कार्यक्रम !
पुणे – ‘शिवजयंती महोत्सव समिती, पुणे’ यांच्याकडून आयोजित केलेल्या ‘शिवजयंती’च्या तपपूर्ती सोहळ्यामध्ये ९५ स्वराज्य रथांची मानवंदना दिली जाणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली. १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९ वाजता ‘लाल महाल’ येथून ‘शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा’ या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सरसेनापती, सरदार, सुभेदार, वीर मावळे आणि वीर माता अशा ९५ स्वराज्य रथांचा समावेश आहे.
भारताच्या इतिहासातील शिवकालीन युद्धकला सादर करणार्या ५१ रणरागिणींचे औरंगासूर मर्दिनी, भद्रकाली रणरागिनी, महाराणी ताराराणी शौर्य पथक हे मर्दिनी युद्धकला सादर करणार आहेत. यामध्ये ‘नादब्रह्म ट्रस्ट ढोलताशा पथक’, ‘५१ रणशिंग’, ‘ओम नमो: परिवर्तन महिला लेझीम पथक’ सहभागी होणार आहेत.