स्थानिक नगरसेक खलिफा यांनी शिक्षकांना दिली धमकी !
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)
जोधपूर (राजस्थान) – येथील पिपर भागात १०हून अधिक मुसलमान विद्यार्थिनी शाळेत हिजाब घालून जाण्याच्या सूत्रावर ठाम राहिल्याने येथे गोंधळ झाला. त्या वेेळी नगरसेवक मुझफ्फर खलिफा हेही पोचले. त्यांनी धमकी देतांना ‘हे सरकार आज आहे, उद्या जाईल; पण शिक्षकांना येथेच रहावे लागेल’, असे म्हटले.
१. हिजाब घालून पोचलेल्या मुसलमान विद्यार्थिनींच्या पेहरावावर शिक्षकांनी आक्षेप घेतल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांना बोलावून आणण्यासाठी विद्यार्थिनींना घरी पाठवले. विद्यार्थिनी त्यांच्या पालकांसह शाळेत परतल्यावर गोंधळ उडाला.
२. मुख्याध्यापक रामकिशोर सांखला यांनी सांगितले की, मुली डोके आणि चेहरा कपड्याने झाकून शाळेत आल्या होत्या. त्यामुळे त्यांना वर्गात बसण्याची अनुमती नाकारण्यात आली. सरकारने ठरवून दिलेल्या गणवेशातच शाळेत येण्याची अनुमती आहे; मात्र कुटुंबियांनी विरोध करत गोंधळ घातला. या वेळी नगरसेवक खलिफाही तेथे पोचले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोचले आणि त्यांनी प्रकरण शांत केले.
संपादकीय भूमिका
|