फसवणार्या मैत्रिणीचा शोध चालू
कल्याण – मुंबईतील एका तरुणीला तिच्या मैत्रिणीने बदलापूर येथे बोलावले. तिला मित्र आणि मैत्रीण यांनी मिळून दारू पाजली. तिची शुद्ध हरपल्यानंतर एकाने तिच्यावर बळजोरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडित तरुणीने बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. ही तरुणी १९ वर्षांची असून कुटुंबियांसह मुंबईत रहाते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित दत्ता जाधव याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. (आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिका :मित्र-मैत्रिणीच फसवणूक करत असतील, तर विश्वास कुणावर ठेवायचा ? |