मुंबई : रेल्वे मंडळाने दादरचे ८० वर्षे जुने असणारे श्री हनुमान मंदिर पाडण्यासाठी नोटीस बजावली होती. त्या नोटिसीला रेल्वेकडूनच स्थगिती देण्यात आली आहे. या नोटिसीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सरकार एक है तो सेफ है’ (एकत्र असलो, तर सुरक्षित राहू) म्हणते; पण येथील मंदिरही सुरक्षित नाही’, असे विधान पत्रकार परिषेदत केले होते. त्यानंतर ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे १४ डिसेंबरला हनुमान मंदिरात महाआरती करणार होते; मात्र त्याआधीच नोटिसीला स्थगिती देण्यात आली आहे.
यासंदर्भातील माहिती भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ‘श्री हनुमान मंदिरात नित्यपूजा आणि आरती चालू रहाणार आहे’, असे त्यांनी सांगितले.
धार्मिक विषयात राजकारण आणू नये ! – मंगलप्रभात लोढा, आमदार, भाजप
विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे पदाधिकारी हे मंदिराच्या संदर्भात केंद्र सरकारच्या संपर्कात होते. आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी यांविषयी चर्चा केली. नोटिसीला आता स्थगिती मिळाली आहे. मंदिर पाडण्यास स्थगिती मिळाल्यानंतरही येथे आरती केली पाहिजे ?
दादर स्टेशन येथील हनुमान मंदिराला काही होऊ देणार नाही, हा शब्द देतो!#Dadar #HanumanMandir #Mumbai #Maharashtra pic.twitter.com/n3GSZ7xq4F
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) December 14, 2024
धार्मिक विषयात राजकीय वळण आणू नये. मंदिराला काहीही होणार नाही, मंदिर आहे त्याच ठिकाणी रहाणार आहे. जे मंदिर जुने आहे, त्याला कुणीही पाडणार नाही. सर्व मंदिरे वाचवण्यासाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल सक्षम आहेत.
शिवसैनिकांकडून किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणा !
मुंबई : दादरच्या हनुमान मंदिराच्या आवारात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि भाजपचे किरीट सोमय्या समोरासमोर आले. त्यानंतर मोठा गोंधळ झाला. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक होत सोमय्या यांच्या विरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करत किरीट सोमय्या यांना बाहेर काढले. किरीट सोमय्या तेथे दर्शनासाठी आले होते. यावेळी मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
हनुमान चालीसा वाचणाऱ्या भक्तांना जेलमध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता हनुमानाच्या शरणी जावं लागत आहे.
त्यांनी मौलाना सज्जाद नोमानी, उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ, वोट जिहादचे शरण स्वीकारले आहे त्यांनी तिथेच राहावे.@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 14, 2024
‘महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी हिंदुत्वाचे सूत्र हाती घेतले आहे. ज्यांनी हनुमान चालिसा वाचणार्यांना कारागृहात टाकले, त्यांनाच हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे’, असे सोमय्या म्हणाले.