सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !

या शिबिरात मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार, आम्ल-पित्त, महिलांचे मासिक पाळीशी संबंधित आजार असे विविध आजार असणार्‍या ५० रुग्णांवर वैद्य दीपक जोशी यांनी उपचार केले.

बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अनन्वित अत्याचाराच्या विरोधात वाशी येथे निषेध मोर्चा !

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अनन्वित अत्याचाराच्या विरोधात वाशी येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे येथे सकल हिंदु समाजाचा मूक मोर्चा !

बांगलादेशातील हिंदु समाजावर होणारे अत्याचार थांबावेत आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता व्हावी, यासाठी येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने ८ डिसेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल’च्या वतीने ‘आरोग्य पंधरवडा शिबिरा’चे आयोजन ! – संतोष कुलकर्णी

वैद्यकीय क्षेत्रात वर्ष १९८६ पासून कार्यरत असलेल्या ‘वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल’च्या वतीने ‘आरोग्य पंधरवडा शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

चिन्मय कृष्णदास प्रभु यांच्या अटकेच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीकडून रायगड येथे आंदोलन, नंदुरबार येथे निवेदन !

भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

उजव्या पायाऐवजी रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करणार्‍या आधुनिक वैद्यांचे फोल दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले !

न्यायमूर्ती पी.एस्. नरसिंह आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपिठाने वर्ष २०१६ मध्ये फोर्टिस रुग्णालयात अस्थिभंगतज्ञ म्हणून शस्त्रक्रिया करणार्‍या डॉ. राहुल काकरन यांचे दावे फेटाळून लावले.

ED Raid Mumbai : ईडीकडून मुंबई आणि कर्णावती येथे ७ ठिकाणी धाडी !

मुख्य आरोपी सिराज महंमदच्या खात्यात १ सहस्र कोटी रुपये जमा झाले. यात ५ आरोपींना अटक केली असून ७ आरोपी पसार आहेत.

Iskcon Temple Attack : ढाका (बांगलादेश) येथे धर्मांध मुसलमानांनी इस्कॉन मंदिराला लावली आग

‘एक हैं तो सेफ हैं’ (संघटित राहिलो, तर सुरक्षित राहू) अशी स्थिती केवळ भारतातील हिंदूंची नाही, तर जगभरातील हिंदूंची झाली पाहिजे. यासाठी भारत सरकारने पुढाकार घेऊन बांगलादेशासह जगभरातील हिंदूंना ‘सेफ’ (सुरक्षित) केले पाहिजे !

UK Revoked Honours Of British Indians : ब्रिटिश राजघराण्याने भारतीय वंशाच्या एका खासदारासह २ नागरिकांची सन्मानाची पदवी घेतली मागे !

यावरून ब्रिटीश राजघराण्याचे खरे स्वरूप समोर येते. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली बीबीसी आणि ब्रिटनमधील खलिस्तानी भारताच्या विरोधात गरळ ओकतात. ब्रिटीश राजघराण्याच्या अशा कृतीमुळे त्यांना बळ मिळणार आहे. भविष्यात ब्रिटन भारतद्वेषाचा अड्डा बनल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

World Meditation Day : ‘२१ डिसेंबर’ ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून साजरा होणार

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ डिसेंबर’ हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव सर्व देशांनी मान्य केला. भारत, लिक्टेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा या देशांच्या गटाने १९३ सदस्यांसमोर हा प्रस्ताव आणला होता. या देशांनी या प्रस्तावासंबंधीची सर्व माहिती संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर मांडली.