पणजी, २९ जानेवारी (वार्ता.) – गोव्याहून विमानाने दुबई, सिंगापूर यांसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणांवर जाण्यापेक्षा प्रयागराज, उत्तरप्रदेश येथे चालू असलेल्या महाकुंभाला जाणे अधिक खर्चिक झाले आहे. चालू आठवड्यात गोवा-प्रयागराज या मार्गावरील एकाच बाजूने विमानाचा प्रतिप्रवासी सरासरी तिकीट दर २६ सहस्र ६१९ रुपये आहे. गोवा-प्रयागराज या मार्गावरील एकाच बाजूचा तिकिटाचा प्रतिप्रवासी सर्वाधिक दर ३१ सहस्र २५७ रुपये आहे. याच कालावधीत गोव्याहून सिंगापूरला जाण्यासाठी प्रतिप्रवासी तिकीट २८ सहस्र ९१६ रुपये ते २९ सहस्र ५६४ रुपये आहे. गोव्यातून दुबईला जाण्यासाठी विमानाचा प्रतिप्रवासी तिकीटदर १३ सहस्र ५१६ ते १५ सहस्र ४२६ रुपये आहे. गोव्याहून बँकॉकला जाण्यासाठी प्रतिप्रवासी तिकीट दर १२ सहस्र ६०२ ते १३ सहस्र ३७८ रुपये यामध्ये आहे. गोव्याहून कौलालंपूर, मलेशिया येथे जाण्यासाठी प्रतिप्रवासी विमान तिकीट दर ११ सहस्र ८८ ते १३ सहस्र १९ रुपये आहे. महाकुंभ संपल्यानंतर गोवा-प्रयागराज या मार्गावरील विमानाचे प्रतिप्रवासी तिकीट ७ सहस्र ४४८ रुपये आहे. महाकुंभाला जाणार्या भाविकांच्या विमान तिकिटामध्ये भरमसाठ वाढ केल्याबद्दल विश्व हिंदु परिषदेने विमान आस्थापनांवर टीका केली आहे. ही दरवाढ अनैतिक असल्याचे विश्व हिंदु परिषदेने म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे संधीचा अपलाभ घेणारी विमान आस्थापने असोत किंवा हिंदूंच्या सणांच्या वेळी तिकीट दर वाढवणारे खासगी प्रवासी बसवाले असोत, हे सर्व ‘व्हाईट कॉलर’ (पांढरपेशे किंवा सुशिक्षित) दरोडेखोरच ! |