मुंबई – वातावरणात थंडी असली, तरी सध्या तापमानही वाढत आहे. वातावरणात आर्द्रता आहे. याचा परिणाम मुंबईच्या प्रदूषणावर होत आहे. २७ जानेवारी या दिवशी मुंबईमध्ये देवनार येथील हवेची गुणवत्ता ‘समीर’ या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ॲपवरील नोंदीनुसार ‘वाईट’ श्रेणीत होती. इतर काही भागांमध्येही हवेची गुणवत्ता खालावल्याची नोंद झाली. माझगाव येथे गुणवत्ता निर्देशांक १९३ नोंदवला गेला. मुंबईच्या हवेचा सरासरी गुणवत्ता निर्देशांक १४७ नोंदवला गेला.
पश्चिमी प्रकोपांमुळे फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. या काळात लातूर, बीड, सोलापूर जिल्ह्यांत किरकोळ पाऊस पडू शकतो, अशी माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
संपादकीय भूमिकावारंवार हवेची गुणवत्ता घसरणे हे आर्थिक राजधानी असणार्या मुंबईसाठी लाजिरवाणे नव्हे का ? |