रायगड – भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
रायगड
वरील मागणीसाठी ६ डिसेंबर या दिवशी परळी बाजारपेठ, सुधागड पाली येथील श्री बहिरीनाथ मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. या वेळी श्री संप्रदाय, व्याघ्रेश्वर मंडळ, स्वराज फाऊंडेशन, शिवदल युवा दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती आणि सनातन संस्था आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नंदुरबार
नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांना इस्कॉन, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी वरील स्वरूपाच्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी ‘इस्कॉन’चे नंदुरबार जिल्हा प्रमुख माधव शामसुंदर दास, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राहुल मराठे, अविनाश पाटील, मयूर चौधरी, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे, आकाश गावित आणि हर्षल देसाई उपस्थित होते.