|
श्री. सचिन कौलकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29222128/Jidnyasu.jpg)
प्रयागराज, २९ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला जिज्ञासूंच्या प्रतिसादाचा ओघ चालूच आहे. हे प्रदर्शन पहाण्यासाठी भाविक आणि जिज्ञासू यांची लक्षणीय गर्दी होत आहे. सनातनच्या प्रदर्शनातून अमृतासारखी सुरेख माहिती वाचून अनेक जिज्ञासू भारावून गेले असून ‘आमची सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा आहे. आम्हाला सनातनच्या कार्याशी जोडायचे आहे, आमच्या गावात हे प्रदर्शन लावावे. शालेय पाठ्यपुस्तकात प्रदर्शनातील विषय घ्यावेत’, असे अनेक उत्स्फूर्त अभिप्राय अनेक जिज्ञासूंनी दिले आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या महाकुंभात सनातनच्या कार्याशी जोडून घेण्याविषयी उत्तरप्रदेशासह, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, आसाम, ओडिशा आणि काश्मीर या राज्यांतील जिज्ञासूंनी अभिप्राय दिले आहेत.
सनातनच्या प्रदर्शनाला कुंभक्षेत्रातील विविध आखाड्यांतील संत-महंत भेटी देत आहेत. आतापर्यंत प्रदर्शनाला भेट देणार्या सर्वच संत-महंतांना प्रदर्शन पुष्कळ आवडले आहे. याचसमवेत बर्याच जिज्ञासूंनी प्रदर्शन चांगले, उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय दिला आहे, तसेच अनेक जिज्ञासूंनी ‘सनातनच्या प्रदर्शनातील माहितीमुळे महत्त्वपूर्ण धर्मशिक्षण मिळते, पुष्कळ शिकायला मिळते, सध्याच्या काळात अशा प्रदर्शनाची आवश्यकता आहे’, असेही अभिप्राय दिले आहेत. यासह सनातनचे प्रदर्शन लावून पुष्कळ वेळ उत्साहीपणे सेवा करणार्या सनातनच्या साधकांचे जिज्ञासूंनी कौतुक केले आहे.
जिज्ञासूंनी व्यक्त केलेले अभिप्राय…
१. आचार्य रामायण प्रसाद, पटवारी आश्रम, रिगा, मध्यप्रदेश : हे प्रदर्शन पाहून चांगले वाटले. देशात अनेक अनावश्यक गोष्टींवर पैसे व्यय केले जात आहेत. त्याहून अधिक चांगले कार्य सनातन संस्था करत आहे. खरेतर हिंदु राष्ट्रासाठी पैसे व्यय केले पाहिजेत.
२. श्री. अभय सिंह, श्री. आशिष सिंह आणि श्री. अनुराग मिश्रा, मिर्झापूर, उत्तरप्रदेश : सनातन संस्थेशी जोडून कार्य करण्याची आणि हिंदु राष्ट्रासाठी योगदान देण्याची माझी इच्छा आहे.
३. हिमांशु, नवाबगंज, बरेली, उत्तरप्रदेश : हे प्रदर्शन पाहून मला पुष्कळ आनंद झाला. माझी सनातनच्या कार्याशी जोडण्याची इच्छा आहे. माझ्या जिल्ह्यातही हे प्रदर्शन लावावे.
४. श्री. सुनील कुमार शुक्ला, बिद्दिया, नवाबगंज, प्रयागराज, उत्तरप्रदेश : अतिशय आकर्षकपणे प्रदर्शन लावले आहे. तुम्ही धर्मजागृतीचे कार्य करता, हे कौतुकास्पद आहे. पुष्कळ वेळ देऊन प्रदर्शन लावण्याची सेवा करणार्या सर्व साधकांचा उत्साह मोठा आहे.
५. श्री. अनुराग तिवारी, प्रयागराज, उत्तरप्रदेश : प्रत्येक व्यक्तीने वेळ काढून सनातनचे प्रदर्शन पाहून सनातन संस्कृतीला समजून घेतले पाहिजे. हे प्रदर्शन अद्भुत आणि सुंदर आहे. यातून पुष्कळ शिकायला मिळाले. ईश्वराने या संस्थेला पुढे न्यावे.
६. श्री. अमित गुप्ता, जम्मू-काश्मीर : प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. सनातन संस्थेची शाखा जम्मू येथे असावी, असे मला वाटते.
७. श्री. मनोज कुमार, हरियाणा : सनातनच्या कार्याशी जोडून तुम्हाला साहाय्य करण्याची माझी इच्छा आहे.