उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कागल येथे आंदोलन !
कागल (जिल्हा कोल्हापूर) – एस्.टी. महामंडळाने तिकीट दरवाढ रहित करावी, या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कागल येथे बसस्थानकात २८ जानेवारीला ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात आले. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, तालुकाप्रमुख जयसिंह टिकले, अजित मोडेकर, भाळूकरी कट्टी, नितीन डावरे, संदीप कांबळे, वैभव आडके यांसह अन्य उपस्थित होते. ‘ही दरवाढ अन्यायी असून यांमुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसत असल्याने ती त्वरित मागे घ्यावी’, अशी मागणी या प्रसंगी संभाजीराव भोकरे यांनी केली.