ED Raid Mumbai : ईडीकडून मुंबई आणि कर्णावती येथे ७ ठिकाणी धाडी !

मालेगाव ‘व्होट जिहाद’ प्रकरण

मुंबई – मालेगाव ‘व्होट जिहाद’प्रकरणी ईडीकडून मुंबई आणि कर्णावती (अहमदाबाद) येथे ७ ठिकाणी धाडी घालण्यात आल्या, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. मालेगावमधील बँकेत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असून हे पैसे ‘व्होट जिहाद’साठी वापरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. मालेगाव येथील बँकांमध्ये काही लोकांकडून विविध खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले होते. या पैशांचा वापर निवडणुकमध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, ‘‘ईडीने धाडींमध्ये साडे तेरा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज महंमदच्या खात्यात १ सहस्र कोटी रुपये जमा झाले. यात ५ आरोपींना अटक केली असून ७ आरोपी पसार आहेत. या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी पुन्हा एकदा ९ डिसेंबरला मालेगावला जाणार आहे.’’