कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकाजवळ पोलीस अधिकार्‍यास ३ धर्मांधांकडून बेदम मारहाण !

खासगी ट्रॅव्हल्स एजंटकडून प्रकार ! 

प्रतिकात्मक छायाचित्र

कोल्हापुर – मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे काम आटोपून मध्यवर्ती बसस्थानकात उतरल्यानंतर शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे निघालेले साहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना खासगी ट्रॅव्हल्सच्या एजंटनी बेदम मारहाण केली. हा प्रकार २८ जानेवारीला रात्री ११.३० वाजता महालक्ष्मी चेंबरसमोर घडला. मुळे यांच्या तक्रारीनुसार अकिब पठाण, दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या तिघांवर गुन्हा नोंद झाला असून यातील दिलदार मुजावर आणि जावेद मुजावर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

विशाल मुळे हे शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे जातांना महालक्ष्मी चेंबरसमोर खासगी ट्रॅव्हल्सचा एजंट अकिब पठाण धावत आला. ‘पुण्याला जाणारी ट्रॅव्हल्स लागली आहे’, असे म्हणत तो हाताला धरून ओढू लागला. मुळे यांनी त्याला स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तरीही तो बसपर्यंत ओढून घेऊन गेला. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मुळे हे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना भ्रमणभाषवरून घडलेल्या प्रकाराची माहिती देत असतांना तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. मुळे हे साध्या वेशात होते. आपण पोलीस अधिकारी असल्याचे ते ओरडून सांगत होते; पण पोलीस आहेस ना ? तुला बघून घेतो, असे म्हणत तिघांनी त्यांना मारहाण केली. (पोलिसांना मारहाण करणार्‍या धर्मांधांची मुजोरी कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मार खाणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? पोलिसांनी स्वतःची सतर्कता वाढवणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारा प्रसंग ! 

पोलीस आहेत, हे ठाऊक असूनही पोलिसांना मारणारे धर्मांध किती उद्दाम झाले आहेत, हे लक्षात येते. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा त्वरित करणे आवश्यक !