भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांची मागणी !
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/30000241/Mahakumbha_Kharge_700.jpg)
पुणे – प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमेळाच्याच्या पावन पर्वात पवित्र गंगा नदीत स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक करोडोंच्या संख्येने सहभागी होत आहेत. पवित्र गंगा नदीमध्ये स्नान करत आहेत; कारण ती हिंदु धर्माची आस्था आहे; मात्र राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कुंभमेळा महापर्वाच्या गंगास्नानावर टीका करून हिंदु धर्माचा अपमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसने याचे दायित्व स्वीकारावे आणि जाहीरपणे क्षमा मागावी, तसेच खर्गेनी देशातील हिंदु भक्तांची जाहीर क्षमा मागावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. ‘अन्य धर्माची अशाप्रकारे उघडपणे टीका करू शकता का ?’, असा प्रश्नही राम कुलकर्णी यांनी केला आहे.